शबरी आदिवासी घरकुल योजना 2023 || Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form: नमस्कार मित्रांनो आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरी नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्य घरात, झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात..
अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची Shabri Adivasi Gharkul Yojana राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

Shabri Adivasi Gharkul Yojana 2023

आदिवासी उपाय योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येते.Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

Shabri Adivasi Gharkul Yojana लाभार्थी पात्रता

  1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
  2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव किमान पंधरा वर्षाचे असावे.
  3. लाभार्थ्यांकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
  4. लाभार्थ्याकडे स्वतःची किंवा कुटुंबाचे पक्की घर नसावे.
  5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form
शबरी आदिवासी घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट 2022-23

अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे👇

  • ग्रामीण क्षेत्र :- रू.1.00 लाख
  • नगरपरिषद क्षेत्र :- रू.1.50 लाख
  • महानगरपालिका क्षेत्र :- रू.2.00 लाख
महत्वपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप 🪀🪀 जॉईन करा 👉 Click Here

Shabri Adivasi Gharkul Yojana लाभ

घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे

  1. ग्रामीण साधारण क्षेत्र : रू.1.32 लाख
  2. नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रू.1.42 लाख
  3. नगरपरिषद क्षेत्र :. रू. 1.50 लाख
  4. महानगरपालिका क्षेत्र:. रू. 2.00 लाख

Shabri Adivasi Gharkul Yojana आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे सध्याच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो.
  2. जातीचे प्रमाणपत्र.
  3. रहिवासी प्रमाणपत्र.
  4. 7/12 उतारा व नमुना 8-अ.
  5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला.
  6. जागा उपलब्धतेचा प्रमाणपत्र.
  7. तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला.
  8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे.
  9. ग्रामसभेचा ठराव.Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजेच, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा लागेल…

शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थी अर्ज नमुना Application Form PDF 👉 Download PDF

 

Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

 

Shabri Adivasi Gharkul Yojana अटी

  1. ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लक्ष मर्यादित आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  2. संदर्भ क्र.11 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देताना वाचा येतील दिनांक. 28.03.2013 व दि. 05.01.2016 च्या शासन निर्णय निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमांकाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार .
  3. संदर्भ. क्र. 13 येथील शासन निन्यातील तरतुदीनुसार सदर योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात येणार. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार.
  4. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी ( Physical Verification ) करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार.
    या व्यतिरिक्त संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन नियमांचे व कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  5. सदर शासन निर्णय जिल्हा निहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टा मध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यांतर्गत पूर्णवितरित करण्याचे अधिकार हे वाचा मधील अनु क्र. 5 येथील दि. 15.03.2016 रोजीच्या शासन निर्णय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीस राहतील.
    संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबर प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी न चुकता आयुक्त, आदिवासी विकास आणि संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रितरीत्या शासनास सादर करावा.Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form
  6. घरकुलावर वाचा येथील अनुक्रमांक 16 मधील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बोधचिन्ह लावण्यात यावे.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलच्या संदर्भात विविध योजना राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून द्या द्यावे यासाठी ह्या योजना राबवल्या जातात…. ही एक राज्य पुरस्कार योजना आहे शबरी आदिवासी घरकुल योजना वर दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही एक अर्ज करून घरकुल मिळू शकता.Shabri Adivasi Gharkul Yojana Application Form

या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की आपल्या इतर मित्रांना शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका.

चला तर भेटूया पुढील एका नवीन उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद….🙏🙏🙏

Leave a Comment