Ration Card New Apply Online, Member Add, Name Correction, Address Change | आता रेशन कार्ड A to Z कामे ऑनलाईन मोबाईलने करा

Ration Card New Apply Online, Member Add, Name Correction, Address Change | रेशन कार्ड A to Z कामे ऑनलाईन मोबाईलने : नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, कारण अनेक दिवसापासून विविध लाभार्थ्यांच्या विविध समस्या होत्या कोणाला नवीन रेशन कार्ड काढायचे होते, कोणाला रेशन कार्ड मध्ये नाव जोडायचे होते, कोणाला पत्त्यात बदल करायचा होता तर कोणाला नावात दुरुस्त करायचे होते अशा विविध रेशन कार्ड संदर्भातील अडचणी सर्व तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आता दूर करता येणार आहेत…

रेशन कार्ड संदर्भातील A to Z माहिती तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत..

मित्रांनो त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Ration Card New Apply Online आता रेशन कार्ड A to Z कामे ऑनलाईन मोबाईलने करा

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत ( RCMS ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई – शिधापत्रिका ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • अंत्योदय अन्न शिधापत्रिका ( AAY )
  • प्राधान्य कुटुंब योजना ( PHH )
  • राज्य योजनेअंतर्गत ( APL Farmer )
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ( NPH )
  • अशा सर्व शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांस संदर्भातील शासन निर्णय,दि.16 मे, 2023 अन्वये ई – शिधापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे…

Ration Card New Apply Online, Member Add, Name Correction, Address Change

राज्यातील नागरिकांना नवीन शिधापत्रिका अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यात बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिका विषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली मार्फत पब्लिक लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तथापि, सदर पब्लिक लॉगिन सुविधा वापर करताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर अडचणी दूर करण्याकरिता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( RCMS ) च्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी Module तयार करण्यात आले असून खालील परिपत्रकासोबत जोडण्यात आले आहे.. या शासन निर्णयामध्ये पूर्ण माहिती दिली आहे…पूर्ण नक्की पहा..


👉येथे क्लिक करून पूर्ण माहिती पहा 📑 👉क्लिक करा 👈
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈
यासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈


अशाच विविध महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला…
ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्की तुमच्या इतर मित्रापर्यंत शेअर करा..


इतर माहितीसाठी 👉 येथे क्लिक करा 👈


धन्यवाद…..🙏🙏🙏🙏

Leave a Comment