Pik Vima Beed Pattern 2023-24 || महराष्ट्रात बीड पॅटर्न पिक विमा योजना लागू झाली

Pik Vima Beed Pattern 2023-24: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण पिक विमा संदर्भात जाणून घेणार आहोत 2023 24 मध्ये राज्यामध्ये बीड पॅटर्न ( 80:120 ) आधारित पिक विमा राबवला जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना फायदा सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया….
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रापर्यंत नक्की शेअर करा 👍🙏

Pik Vima Beed Pattern 2023-24

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016-17  पासून राबविण्यात येत आहे.2023-24 मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (80:120) आधारित राबविली जाणार आहे.

यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या 110 टक्यांपर्यंत असणार आहे, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल.

नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या 80टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या 20 टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून सन 2016-17 पासून ते 2022-23 पर्यंत साधारण रुपये 22 हजार 629 कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.Pik Vima Beed Pattern

 

बीड पॅटर्न पिक विमा योजनेतील पिके

  1. भात(धान)
  2. खरीप ज्वारी
  3. बाजरी
  4. नाचणी(रागी)
  5. मका
  6. तूर
  7. मूग
  8. उडीद
  9. सोयाबीन
  10. भुईमूग
  11. तीळ
  12. सूर्यफूल
  13. कारळे
  14. कापूस
  15. कांदा.    Pik Vima Beed Pattern

Pik Vima Beed Pattern सहभागी शेतकरी

  • अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
  • पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.
  • भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा…👉 💁नमो शेतकरी योजने संदर्भात 👉येथे क्लिक करा 👈

 

Pik Vima Beed Pattern 2023-24 अंतिम मुदत

  • योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत – 31  जुलै 2023
  • सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः 70 टक्के
  • विमा हप्ता : सर्व पिकांसाठी प्रती अर्ज फक्त एक रुपया.  Pik Vima Beed Pattern

उंबरठा उत्पादन :

अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7  वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.Pik Vima Beed Pattern

बीड पॅटर्न पिक विमा साठी मिळेल संरक्षण

  1. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.
  2. पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान : यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.
  3. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर,पावसातील खंड,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०टक्यांहून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
  4. काढणी पश्चात चक्रीवादळ,अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
  5. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
  6. युद्ध व युद्धजन्य परिस्थितीमुळे होणाऱ्या व हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही.Pik Vima Beed Pattern

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

 

बीड पॅटर्न पिक विमा ई-पीक पाहणी:

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

या विमा कंपन्या देणार जिल्हानिहाय सेवा

  1. भारतीय कृषी विमा कंपनी (वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, बीड
  2. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. (नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा)
  3. आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(परभणी,वर्धा, नागपूर)
  4. युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ( नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
  5. एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(हिंगोली,अकोला, धुळे,पुणे, उस्मानाबाद)
  6. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(जालना, गोंदिया, कोल्हापूर)
  7. चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड)
  8. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(यवतमाळ, अमरावती, गडचिरोली)
  9. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(लातूर)
  10. खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय फरक संभवतो

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

 

पीकनिहाय विमा संरक्षणाची रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

  1. भात (₹ ४० हजार ते ५१ हजार ७६०)
  2. ज्वारी (₹ २० हजार ते ३२ हजार ५००)
  3. बाजरी (₹ १८ हजार ते ३३ हजार ९१३)
  4. नाचणी (₹ १३ हजार ७५० ते २० हजार )
  5. मका (₹ ६ हजार ते ३५ हजार ५९८),
  6. तूर (₹ २५ हजार ते ३६ हजार ८०२)
  7. मूग (₹ २० हजार ते २५ हजार ८१७)
  8. उडीद (₹ २० हजार ते २६ हजार ०२५)
  9. भुईमूग (₹ २९ हजार ते ४२ हजार ९७१)
  10. सोयाबीन (₹ ३१ हजार २५० ते ५७ हजार २६७)
  11. तीळ (₹ २२ हजार ते २५ हजार )
  12. कारळे (₹ १३ हजार ७५०)
  13. कापूस (₹ २३ हजार ते ५९ हजार ९८३)
  14. कांदा (₹ ४६ हजार ते ८१ हजार ४२२)

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

 

png

अर्ज करण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

 

हे पण वाचा…👉 👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment