Namo Shetkari Yojana : मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शिर्डी येथून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे. किती तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार ? किती शेतकऱ्यांना मिळणार ? किती कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत वाचा.
नमो शेतकरी 1ला हफ्ता
मित्रांनो, केंद्रशासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे. या योजनेच्या धरतीवरती राज्यशासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एक शिर्डी येथे राज्यशासनाच्या माध्यमातून एक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान राज्यातील 95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1720 रुपये म्हणजेच पहिला हप्ता नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा जमा केला जाणार यासंदर्भातील माहिती राज्यशासनाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल.
मित्रांनो हा हप्ता परत एकदा ध्यानात ठेवा, जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणारेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांमध्ये पात्र असणार आहेत, त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बऱ्याच दिवसापासून रखडली होती. राज्यातील शेतकरी वाट पाहत होते की, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता केव्हा येणार? तर आता शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी क्लीन चीट देण्यात आलेली असून पहिल्या हप्त्यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या वाटपाला मान्यतासुध्दा देण्यात आलेली आहे.
2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर जून 2023 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करून संबंधित विभागाकडून परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये अतिरिक्त 100 कोटी रुपये खर्च झाले. त्यानुसार ही योजना लवकरच सुरू होईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आलेली होती.
नमो शेतकरी योजना पहिला हप्ता
बहुतांश शेतकऱ्यांकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ? तर आता हा प्रश्न मार्गी लागलेला असून शासनाकडून एप्रिल ते जुलै 2023 च्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आता 26 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील शिर्डी याठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
📣 नमो शेतकरी योजना 1720 कोटी रु. वाटप शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नक्की ट्रांसफेर् करा याची फारच अवश्कता आहे