Gharkul Yojana New Update || 10 लाख घरकुल मंजूर 31 मार्च 2024 पर्यंत “महा आवास अभियान 2023-24” सुरू

Gharkul Yojana New Update:नमस्कार मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा…राष्ट्रीय आवास दिनानिमित्त 31 मार्च 2024 पर्यंत “महा आवास अभियान 2023-24” राज्यभर राबविण्यात येणार आहे. Gharkul Yojana New Update

या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर, 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला आहे.

Gharkul Yojana New Update

राज्यात राबविण्यात येणाऱ्या “महा आवास अभियान 2023-24” या अभियानामुळे 10 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Gharkul Yojana केंद्र व राज्य पुरस्कृत

“सर्वांसाठी घरे-2024” या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून…

केंद्र पुरस्कृत

  1. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

राज्य पुरस्कृत

  1. रमाई आवास योजना
  2. शबरी आवास योजना
  3. पारधी आवास योजना
  4. आदिम आवास योजना
  5. अटल बांधकाम कामगार आवास योजना
  6. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
  7. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
  8. मोदी आवास घरकुल योजना

या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे.

या अभियानाचे काम

  1. या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे
  2. घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे
  3. मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे
  4. सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे
  5. प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे
  6. ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे
  7. बहुमजली इमारतीगृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे
  8. डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे
  9. शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे
  10. नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे

इ. 10 उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी केले.

घरकुल यादी 📑 पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा

विविध विभागाचे मंत्री, सचिव व राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला..

तुमच्या गावातील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा..

📑अधिक माहितीसाठी 👉 येथे क्लिक करा

या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा

धन्यवाद……🙏🙏

Leave a Comment