पीएम किसान योजना 15वा हफ्ता तारीख | Check PM Kisan Yojana 15th Installment Date

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची व एकदम लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजना सुरू करण्यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थोडीफार मदत करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी. सदरच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात 6,000 रुपये दिले जातात.

PM Kisan 15th Installment Date

आतापर्यंतच्या जगातील सर्वात मोठ्या DBT योजनांपैकी पीएम किसान योजना ही एक मात्र योजना ठरली आहे. एकाच वेळी 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करणारी किंवा जमा करणारी ही एकमेव केंद्रशासनाची योजना आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. आता देशातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे पंधराव्या हप्त्याची. बहुतांश शेतकऱ्यांकडून 15वा हप्ता कधी मिळणार ? अशा प्रकारची विचारपूस केली जात आहे. पुढील म्हणजेच 15 वा हफ्ता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हफ्त्यापूर्वी ही काम करून घ्या

पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हवा असेल, तर शेतकऱ्यांना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल, तरच सर्व शेतकऱ्यांना येणारा पंधरावा हप्ता मिळू शकतो.

PM किसान नवीन नोंदणी किंवा जुन्या खात्याधारकांना अगोदर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहेत. त्या महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. 👇

  • आपला आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.
  • पीएम किसान योजनेला लिंक असलेला बँक खाते क्रमांक आधार NPCI लिंक असावा, म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असावा.
  • पीएम किसान योजनेची ऑनलाईन स्थिती पाहता, जर तुम्हाला Land Seeding हा पर्याय No दाखवत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन फिजिकल फॉर्म भरून द्यावा लागेल.
  • सातबारा उतारा व आधार कार्डवरील नावात शक्यतो साम्यता असावी.

ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेचा चौदावा हप्ता मिळालेला नसेल, अशा शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाची सध्यास्थिती तपासावी. त्यामध्ये जर त्रुटी दाखवत असतील, तर वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या आवश्यक बाबी पूर्ण करून घ्याव्यात. अशा प्रकारे केवायसी करणे, आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करणे किंवा तहसील कार्यालयात जाऊन आपल्या जमिनीची नोंद असल्याबाबतचा फिजिकल फॉर्म भरून देणे.

अडचण असल्यास खालील ठिकाणी संपर्क

शेतकरी मित्रांनो वैयक्तिक फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा मागील हप्ता आलेला नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवरती अर्ज पाठवू शकता. त्याचबरोबर पीएम किसान योजनेत संदर्भात नुकताच नव्याने सुरू करण्यात आलेला हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-23381092 या नंबरवर संपर्क साधू शकता.

Leave a Comment