Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana: मित्रांनो स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सन 2022 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा रू.4200.00 लाख एवढा निधी कृषी आयुक्ताल्यास वितरित करण्यात आला आहे…. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो खरंच तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा सर्व सविस्तरित्या समजून येणार आहे.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana शासन निर्णय
राज्यात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 4200.00 लक्ष ( रुपये बेचाळीस कोटी फक्त ) इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदरचा निधी चालू वर्षी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधी प्रथम प्रलंबित दायित्वाच्या अदागयीसाठी वापरण्यात यावा. तदनंतर उर्वरित निधी चालू वर्षासाठी वापरावा.
अनुदान हे १६ फळबाग लागवड करण्यासाठी दिले जाते
|“नवीन पद्धतीने” नुकसान भरपाई मिळणार येथे क्लिक करा
💁इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा👈
पूर्ण माहिती वाचा नक्की लाभ मिळणार
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana लाभार्थी पात्रता
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता पात्र ठरता येत नाही असे शेतकरी Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात..
- शेतकऱ्याच्या नावे 7/12 बंधनकारक
- शेतकऱ्यांचे संयुक्त सातबारा असल्यास सर्व शेतकऱ्यांचे सहमती पत्र आवश्यक आहे.
- महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज सर्वसाधारण यांची निवड करण्यात येईल.
- फळबाग लागवडीसाठी कोकण विभागाला किमान 0.10 हेक्टर ते कमाल 10.00 हेक्टर बाकीच्या विभागासाठी किमान 0.20 ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र मर्यादेला लाभ राहणार आहे.
- यामधील एकूण क्षेत्रामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही विविध फळबाग लागवड करू शकता.
- शेतकरी पूर्वी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेतला असल्यास ज्या क्षेत्रात त्यांनी लाभ घेतला आहे तो क्षेत्र वगळून बाकीच्या क्षेत्रात लाभ घेता येईल.
📝अशाच प्रकारच्या विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचे व्हाट्सअप ग्रुप 🪀🪀जॉईन करा
👉👉 येथे क्लिक करा 👈
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्र. 1 येतील शासन निर्णय स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे.
वित्त विभागाच्या संदर्भ क्र. 2 येथील परिपत्रकास अनुलक्षुन स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022- 23 मध्ये राबवण्यासाठी रू. 104500.00 लक्ष इतक्या निधीच्या कार्यक्रमास
संदर्भ क्र.3 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता संचालक ( फलोत्पादन ), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी
संदर्भ क्र.4 येथील पत्रानव्ये सन 2022- 23 कधीचा निधी वितरित करण्याबाबत विनंती केली आहे. त्यास अनुलक्षुन सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनासाठी अर्ज
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर ( MahaDBT Farmer Scheme Portal ) अर्ज करावा लागेल..
या पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येत असेल तर व्यवस्थित रित्या करून घ्या अन्यथा तुमच्या जवळच्या CSC सेंटर किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यावरती जाऊन सविस्तर रित्या अर्ज करून घेऊ शकता.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी Anudan
मित्रांनो या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 100 टक्के अनुदान दिले जाते .
- यामध्ये खड्डे खोदणे.
- रोपे लागवड करणे.
- पिकाचे संरक्षण करणे.
- नांग्या भरणे.
- ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शासन निर्णय
मित्रांनो हा शासन निर्णय फक्त निधी उपलब्ध करण्या संदर्भातला आहे…..
📸व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉 येथे क्लिक करा 👈
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा..