मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजना || Best 5 Scheme For Daughter

Best 5 Scheme For Daughter: नमस्कार मित्रांनो सरकारच्या माध्यमातून मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलीचे शिक्षण आणि आरोग्य संदर्भातील आर्थिक आणि कल्याणकारी योजना प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने आपण या लेखामध्ये मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…. त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचून घ्या..

मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजना खालील प्रमाणे: 👇

  1. सुकन्या समृद्धी योजना
  2. सीबीएसई उडान योजना
  3. माझी कन्या भाग्यश्री योजना 
  4. बालिका समृद्धी योजना
  5. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना 

या 5 योजने संदर्भात माहिती खाली दिली आहे.

अशा या 5 योजना मुलीसाठी प्रभावीपणे शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील गोरगरिबांना त्यांच्या मुलींचा शिक्षण,आरोग्य ,लग्न या चांगल्या पद्धतीने पार पाडता याव्यात यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत…या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या पालकांना त्यामधून थोडीफार आर्थिक मदत सुद्धा होईल…. या गुंतवणुकीच्या माध्यमातून पालकांना हातभार सुद्धा नक्की लागेल..Best 5 Scheme For Daughter

Best 5 Scheme For Daughter || मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजना

1.सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samruddhi Yojana

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते ही योजना मुलीसाठी एक अतिशय प्रभावशाली योजना आहे. मुलीच्या भविष्यासाठी पैशाची बचत करता यावी, यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली…. या योजनेअंतर्गत मुलीच्या शैक्षणिक खर्च व लग्नासाठी खर्च या योजनेमधून पार पाडता येतात…म्हणून ही योजना एक अतिशय उपयुक्त योजना आहे.

  1. या योजनेमध्ये 0 ते 10 वर्षापर्यंत ज्या मुली असतील त्यांचे पालक भारतातील कोणत्याही बँकेमध्ये जाऊन खाते खोलू शकतात आणि या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात…
  2. या योजनेमध्ये कमीत-कमी 250 रुपये व जास्तीत-जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
  3. गुंतवलेली पैसे मुलगी जेव्हा 21 वर्षाची पूर्ण होईल तेव्हा यामधून घेता येतात…
  4. या योजनेचे व्याजदर 7.60% एवढे असते यामध्ये फेरबदल सुद्धा होऊ शकते.Best 5 Scheme For Daughter

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:

  1. जन्मदाखला
  2. पालकांची फोटो आयडी
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
  5. इत्यादी…..

2.सीबीएससी उडान योजना (CBSE)

सीबीएससी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना मुलीसाठी राबवली जात आहे. या योजनेमध्ये तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी, आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना प्रोस्ताहन मिळावे. हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत जी मुली दहावीत सरासरी 70 टक्के आणि गणित व विज्ञान विषयात 80 टक्के मार्क्स मिळवलेली कोणतीही मुलगी या योजनेसाठी पात्र ठरू शकते.

ज्या मुलींची या योजनेमध्ये निवड होईल अशा मुलींना 11वी, 12वी साठी मोफत कोर्स मटेरियल ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाते. मुलीच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते अभ्यासामध्ये मदत केली जाते. मुलींच्या जे काही अभ्यासा संदर्भातले समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध केला जातो. मुलींना योग्य त्या करियर च्या संदर्भात संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अधिक माहितीसाठी Best 5 Scheme For Daughter cbse.gov.in

Best 5 Scheme For Daughter

💁यासंदर्भात अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

आता शासन मिटवणार शेतजमिनीचा वाद || Salokha Yojana Maharashtara

3.माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashri)

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेत लाभ घेण्यासाठी

  1. एका मुलीच्या जन्मानंतर आई-वडिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार रुपये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुलींच्या नावे जमा केली जाते.
  2. दोन मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलीच्या नावे 25 हजार रुपये जमा केले जातात.
  3. जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हाही रक्कम त्यांना काढता येते.
  4. मुलगी जेव्हा 6 वर्षाची किंवा 12 वर्षाची होईल तेव्हा त्या पैशावरची व्याज त्यांना काढता येते.
  5. ज्या लाभार्थ्यांचे नाव दारिद्र्य खाली आहे किंवा वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे.
  6. असे महाराष्ट्रातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.Best 5 Scheme For Daughter

Best 5 Scheme For Daughter

💁या संदर्भातील अधिक माहितीसाठी/ शासन निर्णय पहा📒
👉येथे क्लिक करा👈

4.बालिका समृद्धी योजना (Balika Samruddhi Yojana)

  • या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातल्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते.
  • जे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा कुटुंबातील 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • यामध्ये पात्र असलेल्या मुलींच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत रक्कम दिली जाते.
  • जेव्हा मुली शाळेत जातील तेव्हा त्यांना 300 ते 1000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते.
  • BPL च्या मुलीला जन्म देणाऱ्या आईला रु.500/- एक रकमी अनुदान म्हणून BMS दिले जाते.
  • या योजनेत आतापर्यंत 12,357 मुलींचा समावेश आहे.Best 5 Scheme For Daughter
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन या संदर्भातील अधिक माहिती घेऊ शकता.

Best 5 Scheme For Daughter

💁या संदर्भात अधिक माहितीसाठी📒
👉 येथे क्लिक करा👈

5.बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

  1. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश असा होता की मुलीच्या जन्माला व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात यावा.
  2. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
  3. सुकन्या समृद्धी योजना ही सुद्धा या योजनेचा एक भाग आहे.
  4. स्त्री भ्रूण हत्या रोखणे , मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढवणे हे मुख्य उद्देश आहेत.
  5. त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळणे व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.Best 5 Scheme For Daughter

Best 5 Scheme For Daughter

💁कामाच्या माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो या लेखामध्ये आपण मुलींसाठी सर्वोत्कृष्ट 5 योजने बद्दल माहिती जाणून घेतली.खरंच तुमच्या मुलींची तुम्हाला काळजी असेल, तर नक्की या योजनेचा फायदा घ्यायला विसरू नका……

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला…. 👉येथे क्लिक करा 👈

आपण दिलेली माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका…

विविध माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला 🪀🪀जॉईन करा.👉 येथे क्लिक करा 👈

धन्यवाद………🙏🙏🙏

Leave a Comment