Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra (2023) New ‘GR’ || “नवीन पद्धतीने” नुकसान भरपाई मिळणार

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra: मित्रांनो राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्ध करिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीचे पैसे आता नवीन पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

प्रचलित कार्यपद्धतीमध्ये विविध बाबी करता शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात येतो विभागीय आयुक्त हा निधी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना व्यतिरिक्त करतात सबंधित जिल्हाधिकारी हा निधी संबंधित तहसीलदार यांना वितरित करतात.

संबंधित तहसीलदार हे कोषागरात देयक सादर करून रक्कम आहरित करतात. ही रक्कम तहसीलदारांकडे असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यानंतर मदतीचा निधी बाधित व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra)सदर प्रक्रियेमध्ये शासनास प्रस्ताव प्राप्त होणे, प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बाबतचा निधी प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरित करेपर्यंत बराच कालावधी जातो.Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra वाटपाची नवीन पद्धत

शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, दि. 29.07.2022 अन्वये “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ” अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून ‘MAHA IT’ यांची Portal साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार, पणन वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो,

Ativrushti Nuksan Bharpai

🙋कामाच्या माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈……

त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार वितरित न करता MAHA IT यांचे कडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करून निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अमलबजावणी समितीच्या दिनांक 04.11.2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे.

शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानी करता पात्र शेतकऱ्यांना द्यावाच्या मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

नवीन पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांच्या व शेत जमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी यापुढे प्रचलित कार्यपद्धतीनुसार वितरित न करता MAHA IT यांच्याकडून यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीवर खालील प्रमाणे सर्वसाधारण कार्यपद्धतीनुसार वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.Ativrushti Nuksan Bharpai

नवीन कार्यपद्धती MAHA IT

सर्व संबंधित तहसीलदार हे सोबतच्या विवरणपत्रामधील रखान्यात नमूद केलेल्या नमुन्यात पात्र शेतकऱ्यांची सर्व माहिती Excel Format मध्ये भरून, MAHA IT या कंपनीकडून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॉगिनद्वारे याकरिता विकसित केलेल्या पोर्टलवर पाठवतील.

  1. तहसीलदार यांच्याकडून संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचे वतीने त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार संबंधित प्रांत अधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून अनुमोदित करण्यात येतील.
  2. या याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्ह्या निधीच्या मर्यादेत अनुमोदित करण्यात येतील.
  3. तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीचे संगणकीय प्रणालीवर संस्करण करण्यात येईल. ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत ( उदा. लाभार्थ्यांची द्वीरूक्ती, आधार क्रमांक अयोग्य असणे, इ. ) अशी माहिती त्रुटी दूर करण्यासाठी तहसीलदार यांना संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल.
  4. यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्राकरिता दोन व्यक्तींना होणारे रकमेचे प्रधान टाळता येईल.
  5. तहसीलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक ते दुरुस्ती करता येईल आणि ही माहिती पुन्हा संगणकीय प्रणालीवर अपलोड करता येईल.
  6. तहसीलदार व प्रांतअधिकारी किंवा निवासी उपजिल्हा अधिकारी यांचेकरिता Standard Operating Procedure ( SOP ) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

नवीन पद्धतीने नुकसान भरपाई यादी तयार List

अशा रीतीने संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याचे नाव, बाधित क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शवणारी विशिष्ट क्रमांक यादी ( VK List ) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल.

  • ही यादी तहसीलदार यांना पोर्टलवरून डाऊनलोड करून घेता येईल.
  • ही यादी ग्रामपंचायत निहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाहीर रित्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी/ ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

Ativrushti Nuksan Bharpai

📝शासन निर्णय पाहण्यासाठी 👀
👉येथे क्लिक करा 👈…

 

आधार प्रमाणीकरनाची सेवा शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क असेल

  1. विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजीकच्या Common Service Centre ( CSC – SPV ) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांक द्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक्य राहील.
  2. लाभार्थ्यांनी ओळख पटवल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँकेमार्फत ( SBI ) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.
  3. जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजीकच्या Common Service Centre ( CSC – SPV ) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे बायोमेट्रिक ओळख पटवण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती ( नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक, इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत यांना अवगत करण्याची सुविधा असेल.
  4. तदनंतर CSC सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसीलदार यांना पाठवेल.
  5. तहसीलदार यांच्याकडून सदर माहिती दुरुस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना CSC सेंटर किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र‘ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल
  6. हा निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी सध्या SBI मध्ये स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल.
  7. आधार प्रमाणीकरनाची सेवा शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क असेल.

दिनांक 04.11.2022 रोजी झालेल्या विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार Common Service Centre ( CSC – SPV ) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना प्रती पात्र लाभार्थी रू.20/- आधी त्यावरील कर अशी रक्कम राज्याच्या निधीमधून देण्यात येईल.

मित्रांनो सदरची माहिती आपण शासन निर्णयानुसार घेतलेली आहे.

.

Ativrushti Nuksan Bharpai

💁यासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉येथे क्लिक करा👈….

Leave a Comment